Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खूनप्रकरणातील 10 आरोपींविरूध्द मोक्का, आयुक्तांकडून आत्तापर्यंत 42 टोळ्यांवर MCOCA

हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खूनप्रकरणातील 10 आरोपींविरूध्द मोक्का, आयुक्तांकडून आत्तापर्यंत 42 टोळ्यांवर MCOCA
, सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (22:48 IST)
पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गारवामुळे (त्याच्या शेजारच्या अशोका  हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देवून हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून (केला. या प्रकरणातील 10 आरोपींवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
 
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 18 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांची दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येऊन वार केले. आरोपींनी रामदास आखाडे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर तलवारीने सपासप वर करुन गंभीर जखमी केली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान 21 जुलै रोजी मत्यू झाला.
 
लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान आरोपी बाळासाहेब जयवंत खेडेकर यांनी त्यांच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून भाचा सौरभ उर्फ चिम्या व इतरांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगून खून केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय-56 रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) निखिल बाळासाहेब खेडेकर (वय-24) सौरभ उर्फ चिम्या कैलास चौधरी (वय-21 रा. अशोका हॉटेलमागे, उरळी कांचन), अक्षय अविनाश दाभाडे (वय-27 रा. सोरतापवाडी, ता. हवेली), किरण विजय खडसे (वय-21 रा. माकडवस्ती, ता. दौंड), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय-23 रा. कॅनरा बँकेचे मागे शिंदावणे रोड, उरुळी कांचन), गणेश मधुकर माने (वय-20 रा. कोरेगाव), निखिल मंगेश चौधरी (वय-20 रा. कोरेगाव. मुळ ता. हवेली), निलेश मधुकर आरते (वय-23 रा. तुकाईदर्शन, हडपसर), काजल चंद्रकांत कोकणे (वय-19 रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली असून सध्या ते येरवडा कारागृहात (Yerwada Jail) न्यायबंदी आहेत. तसेच एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुन्ह्यातील आरोपी निलेश आरते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
तसेच इतर आरोपींवर जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी करणे, हत्यार व अग्निशस्त्रे बाळगणे असे गुन्हे हडपसर (Hadapsar) आणि लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात 21 गुन्हे दाखल आहेत.
 
आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
यांनी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (deputy commissioner of police namrata patil)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (additional commissioner of police namdev chavan)
यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते (Assistant Commissioner of Police Kalyanrao Vidhate) हे करीत आहेत. 
 
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Pune Police Joint Commissioner Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police Namrata Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप घनवटे, पोलीस शिपाई गणेश भापकर यांच्या पथकाने केली.
 
आतापर्यंत 42 टोळ्यांवर मोक्का
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 42 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी