Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागणार नाही

वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागणार नाही
, गुरूवार, 3 मार्च 2022 (12:10 IST)
विद्यार्थ्यांनी परदेशात शिकण्यासाठी जाण्याऐवजी इथेच शिक्षण घ्यावे, यासाठी अशी पावले उचलली जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावर एकत्र काम करणार आहे.
 
महाराष्ट्र सरकार लवकरच युक्रेन आणि रशियाचे वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यांच्या फीचा अभ्यास करणार आहे. याबाबत राज्य सरकारनेही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. युक्रेन आणि रशियाच्या धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे हा त्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थी परदेशात का शिकायला जातात याचा अभ्यास सरकार करेल, असे ते म्हणाले.
 
विद्यार्थ्यांनी परदेशात शिकण्यासाठी जाण्याऐवजी इथेच शिक्षण घ्यावे, यासाठी अशी पावले उचलली जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावर एकत्र काम करणार आहे. मंत्री काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्यत्व मोहिमेत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची ओळख होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगतसिंह कोश्यारींच्या भाषणावेळी 'जय शिवाजी'च्या घोषणा, राज्यपाल अभिभाषण न करताच गेले