Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीत भेटी, चर्चेला उधाण

भाजपच्या बड्या नेत्यांच्या  दिल्लीत भेटी, चर्चेला उधाण
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:11 IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे  यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, फडणवीस दिल्लीला गेल्याने आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात दिल्लीत खलबतं होणार असल्याची चर्चा आहे. 
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते. 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर सांगितलं. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indonesia Open: पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, जर्मनीच्या युवोने लीचा पराभव