Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करणार -आव्हाड

भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करणार -आव्हाड
, शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:41 IST)
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे.ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरं आहेत. भिवंडी पालिका प्रशासनानं भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करणार,असं आव्हाड यांनी म्हटलंय.
 
भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक आणि अनधिकृत इमारती उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात अशा इमारती कोसळून दुर्घटना घडत असतात.अशा दुर्घटनेत आतापर्यंत अनेकांचा जीव गेलाय.शुक्रवारी सकाळी शहरातील आजमी नगर भागात एक अनधिकृत इमारत कोसळून त्यात एकाचा बळी गेलाय. तर सहा जण जखमी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.तर जखमींना 50 हजार रुपये मदत आणि त्यांच्यावरील उपचाराचा खर्च महापालिका प्रशासन करेल,असं जाहीर केलं. 
 
जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे.आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत.हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे,अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 
 
 यापुढे LOI घेतल्यानंतर किती दिवसात काम करायचे याची कायद्यात तरतूद केली जाईल.जवळजवळ 50 हजार कोटी रुपये बिल्डरांनी गुंतवले आहेत.तरीही हे प्रकल्प तयार झालेले नाहीत.बिल्डरांनी LIO दाखवून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली आहेत,असं सांगतानाच ज्या एसआरए प्रकल्पात मूळ रहिवाशांची घरे न बांधता विक्री करण्यासाठी आधी इमारती बांधल्या असतील अशा ठिकाणी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल,असंही त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत’मुख्यमंत्री