Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“मी शेतकरी बोलतोय”

“मी शेतकरी बोलतोय”
‘मी शेतकरी बोलतोय” हा संवादरूपी प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात,मखमलाबाद येथे शेतकरर्यांच्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपत सहभागी होण्याचे आवाहन केले. या संवादरुपी भाषणातून शिवकार्य गडकोट संस्थेच्या बाल शाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख ह.भ.प.प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गावून,शेतकरी काव्यातून  शेतकऱ्यांना शेतकरी संपात सहभागी होण्याची साद घातली.
 
येत्या १ जून पासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकरी संपात जात आहे.आपला शेतीमाल,धान्य,दुध,फळेफुले,बाजारात न्यायाची नाही,सरकार विरोधात पूर्ण असहकार पुकारण्याच्या हेतूने शेतकरी संपाची तयारी सुरु आहे.या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात हि किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संपाबाबत शिवार सभा,पत्रके वाटणे,शेतकरी बैठका होत आहे,आपल्या गावातील शेतीमाल शहरात येवूच द्यायचा नाही,आठवडे बाजारासह,शेतीमाल,शेती संलग्न व्यवसाय बंद ठेवायचे,यासाठी प्रचार प्रसार प्रबोधन केले जात आहे. 
 
शेतकऱ्यांचा संप हा शेतकऱ्याचा स्वतः चा संप आहे,यशस्वी करण्यासाठी जो-तो आपल्या परीने प्रचार प्रसार करीत आहे.त्याचाच भाग म्हणून शेतकरी वाचवा अभियानाने गावोगावी शेतकरी सभा,गाव सभा,चावडी सभा सतत सुरु केल्या आहेत.जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ लिखित “मी शेतकरी बोलतोय” या विषयावर बालशाहीर करण मुसळे याने शेतकरी पात्र हरी या माध्यमातून नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अवघड क्षण,शोषण,यातना मांडल्या, “शेतकऱ्यांनो रात्र वैरर्याची आहे,जागे व्हा,आज काही शिवकाळ नाही त्याकाळी शेतकरी हा समृद्ध होता,एक हि शेतकरी आत्महत्या होत नव्हती,आज वर्तमानात शेतकरी दुखी: आहे, लाखो शेतकऱ्यांनी गत २ वर्षात हरी प्रमाणे आपला जीव संपवला,आता तर जागे व्हा, अरे तो जात्यात तर तुम्ही 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गांधी स्मारक चालते मग बाळासाहेबांचे का नाही!