अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शोभानगर येथे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी चाकू हल्ल्यात दूध विक्रेते आकाश नारायण कदम गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतं त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
मयत आकाश हा दूध विकण्याचा व्यवसाय करायचा.मंगळवारी दूध वाटून तो शोभानगरमार्गे घरी जात असताना रस्त्यावर दुचाकीस्वार उभा होता. आकाशने त्याला बाजू होण्यास सांगितले यावरून आरोपीने त्याला शिवीगाळ केली. त्याने फोनवरून आणखी दोघांना फोन केले.
दोघांनी तिथे येऊन आकाशावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला असून काही नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याला तिथून रेफर करून खाजगी रुग्णालयात दाखल केले. गाडगेनगर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याचे जबाब नोंदवले. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांच्या विरुद्ध प्राणघातक हला केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा मूळ आरोपीला अटक केली आहे. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे.