Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी देतील- मंत्री गिरीश महाजन

girish mahajan
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (21:29 IST)
पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
गिरीश महाजन म्हणाले, “पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. ते पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी देतील. एक तासापूर्वी पंकजा मुंडेंनी मला फोन केला आणि अभिनंदन केलं. त्या नाराज आहेत असं दिसलं नाही. माध्यमंच त्या नाराज असल्याचं बोलत आहेत.”
 
“पंकजा मुंडे नाराज नाहीत, माध्यमंच त्या नाराज असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. त्या मध्य प्रदेशसारख्या राज्याच्या प्रभारी आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील,” असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Salman Rushdie Attacked: लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रमा दरम्यान स्टेजवर चाकूने हल्ला