Publish Date: Wed, 28 Sep 2022 (12:48 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (12:50 IST)
अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात रस्ते कामाची पाहणीला गेले असता त्यांचा कामकाजाच्या संदर्भात वाद - विवाद झाला आणि त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला 'आधी ऐकून घे, शांत बस! असं म्हणत कानशिलातच लगावली. या वेळी केमेऱ्या समोर पोलीस देखील उपस्थित होते. घडलेल्या या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा सुरु आहे.
आमदार बच्चू कडू हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच.ते आता एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावण्याच्या प्रकारामुळे चर्चेत आले आहेत.
गणोजा गावात विकास कामाची पाहणीला गेले असता कामकाजा संदर्भात त्यांची बाचाबाची कार्यकर्त्यांसोबत झाली या वर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लागवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्य ते कार्यकर्त्याला आधी ऐकून घे, शांत बस ! असे म्हणतं कानशिलात लगावताना दिसत आहे.