Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार पी.एन. पाटील यांचे निधन!

PN patil
, गुरूवार, 23 मे 2024 (11:48 IST)
महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन झाले आहे. आज त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तसेच ते 71 वर्षाचे होते. तसेच आमदार पी.एन. पाटील हे जीवनभर गांधी कुटुंबाचे विश्वासपात्र रूपात जाणले जायचे. रविवारी सकाळी बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 
 
तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मावळली. मिळालेल्या माहितीनुसार आमदार पी.एन. पाटील यांच्या पार्थिव शरीरास सकाळी 11 वाजता पैतृक गावात सदौली खालसा मध्ये नेण्यात येईल. 
 
पी.एन. पाटील हे रविवारी सकाळी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळाले. कुटुंबीयांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले. तसेच चिकिस्तकांनी त्यांना चेक केल्यावर सांगितले की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच यांची तात्काळ सर्जरी करण्यात आली पण त्यांच्या मेंदूवरची सूज कायम राहिली. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. ते वयस्कर असताना देखील काम करीत होते. त्यामुळे त्यांना थकवा येत होता. पण आज चार दिवसानंतर या लोकप्रिय नेत्याची प्राणज्योत मावळली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LPG सिलेंडर लीक झाल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू