Publish Date: Thu, 23 Jun 2022 (08:34 IST)
Updated Date: Thu, 23 Jun 2022 (08:37 IST)
दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम हे शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गुहाटीला रवाना झाले आहेत. यामुळे दापोली विधानसभा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आमदार योगेश कदम हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. काल ते दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी होते. मात्र रात्री ते अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता गुवाहटीला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.