Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१२ बंडखोरांची आमदारकी रद्द होणार? प्रभारी विधानसभाध्यक्षांना दिले हे पत्र

Narhari Zirwal
, शुक्रवार, 24 जून 2022 (08:34 IST)
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी ठाकरे यांनी आक्रमक धोरण स्विकारले आहे. याचाच एक बाग म्हणून सेना गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली आहे. सेनेत बंडखोरी करणाऱ्या १२ ते १५ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेने यापूर्वीच शिंदे यांना गटनेते पदावरुन हटविण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता या १२ जणांची आमदारकी जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन न करता विधानसभेत शिवसेनेमध्ये फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेला ३७ हा महत्त्वाचा आकडा आधीच गाठला आहे. तसेच, शिवसेनेचे आणखी तीन आमदार बंडखोर छावणीत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला आणखी बळ मिळाले आहे.
 
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सध्या केवळ सरकार वाचवण्यासाठीच नव्हे तर वडील बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असलेल्या शिवसेनेलाही वाचवण्याचा दबाव आहे. शिंदे स्वत:ला खरा शिवसैनिक म्हणवून घेत असून ते उद्धव यांच्याकडून केवळ मुख्यमंत्रिपदच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुखपदही हिसकावून घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे सूत्रांकडून समजते. महाविकास आघाडीने यापूर्वी शिंदे गटाकडे केवळ १७ आमदार असल्याचा दावा केला होता. तर शिंदे यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ४२ पेक्षा अधिक आमदारांची पुष्टी झाली आहे.
 
बंडखोर शिंदे गटाला मोठी धडा शिकविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने सर्व बंडखोर आमदारांऐवजी १२ आमदारांविरोधात अपात्रता प्रस्ताव उपसभापतींकडे पाठवला आहे. त्यावर आधी निर्णय होऊ शकतो, असा विश्वास शिवसेनेला आहे. कारण यापूर्वी शिवसेनेने शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवण्याचे आवाहन केले होते, ते मान्य करण्यात आले आहे. शिवसेनेने आपल्या आवाहनात म्हटले आहे की, व्हीपनुसार हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. या हालचालीमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदेंच्या बंडावरुनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेमध्ये मतभेद