Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sachin Patil किरकोळ वादातून मनसे शहरप्रमुखाची हत्या

Sachin Patil किरकोळ वादातून मनसे शहरप्रमुखाची हत्या
, मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (10:10 IST)
परभणी: रात्री दोनच्या सुमारास परभणीमध्ये मनसे शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. खुनाची ही खळबळजनक घटना घडली. मनसे शहरप्रमुख सचिन पाटील (Sachin Patil) यांची परभणीत हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत. खुनाच्या या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  या हत्येमागे खरोखरच काही हेतू होता की अन्य काही वाद, हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. त्याअंतर्गत पोलीस पुढील तपास करत आहेत. या हत्येचा मास्टरमाईंड सचिन पाटीलचा मित्र असल्याचाही संशय पोलिसांना आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rishi Sunak ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्यापेक्षा लोकप्रिय, तरीही या 3 कारणांमुळे हरले