Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूरदर्शन सह्याद्रीवर मराठी कार्यक्रमच दाखवावेत, मनसेची मागणी

दूरदर्शन सह्याद्रीवर मराठी कार्यक्रमच दाखवावेत, मनसेची मागणी
, गुरूवार, 21 जुलै 2022 (09:21 IST)
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
 
राज ठाकरे यांचं हे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना दिलं.
 
"दूरदर्शनने 15 ऑगस्ट 1994 रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरू केली, तेव्हा त्याचा उद्देश राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण व्हावे असा होता. परंतु, सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जातात, हे मूळ उद्देशाला धरून नाही," असं या पत्रात म्हटलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी