Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त, सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी समावेशाचे आश्वासन

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त, सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी समावेशाचे आश्वासन
, शनिवार, 26 डिसेंबर 2020 (15:45 IST)
मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.
 
“ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. पुढे ते म्हणाले की, “राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सरकारला इशारा