Publish Date: Fri, 20 May 2022 (08:04 IST)
Updated Date: Fri, 20 May 2022 (08:06 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात होणार असल्याची माहिती मनसेने दिली होती. मात्र ठिकाणावर एकमत होत नव्हतं. अखेर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. रविवारी गणेश कला क्रीडा मंचात सकाळी दहा वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली.
शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला. स्थळ आणि तारीख याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली होती. अखेर गणेश कला क्रीडा मंचावर ही सभा घेण्याचं ठरलं आहे.