Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्या राजाला साथ द्या, मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर

तुमच्या राजाला साथ द्या, मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर
राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचा एकमेव आमादार हा शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 
 
मनसेचे 2009 मध्ये तेरा आमदार निवडून आले होते. मात्र मोदी लाटेत 2014 मध्ये हा आकडा फक्त एकवर आला होता. आता तर मनसेचा एकच आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्यानं मनसेची विधानसभेतील पाटी कोरी होणार आहे. 
 
2014 च्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा मोठा परभव झाला होता. यामध्ये मनसेचे सर्व विद्यमान आमदारदेखील पराभूत झाले, मात्र सोनावणे यांनी पुणे येथील जून्नरमध्ये विजय मिळवला होता. आता मात्र सोनावणे यांनी देखील मनसे पक्ष सोडण्याच्या तयारी केली आहे. सोनावणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते आजच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार शक्यता आहे. 
 
शिवसैनिकांनी मात्र आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास जोरदार विरोध दाखवला आहे. शिवसैनिक आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, आम्ही तो स्वीकारणार नाहीत, अशी स्थानिक शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कोणत्या प्रकारे हे प्रकरण हाताळतील हे येणार दिवसात दिसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कान आणि मेंदूमध्ये गाठ, नाशिकमध्ये इजिप्तच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया