Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज सोमवार पासून मैदानात करणार जोरदार प्रचार

राज सोमवार पासून मैदानात करणार जोरदार प्रचार
राज्यातील निवडणुकात सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीत अजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला प्रचार सुरु केला नाही. पक्ष कार्यकर्ते जरी प्रचार करत असले तर मनसे प्रमुख राज ठाकरे अजून तरी प्रचारात नव्हते, मात्र सोमवारपासून ते दौरा सुरु करत असून प्रचार करणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवाडणूकीत फार मोठा फटका बसला होता. तर अनेक ठिकाणी पराभव झाला होता. मात्र आता ती नामुष्की येवू नये आणि मोठ्या प्रमाणत जागा जिंकून नाशिकमध्ये सत्ता कायम ठेवण्या करिता राज आग्रही राहणार आहे. राज यांच्या नाशिक मध्ये केलेल्या  कामगिरीचे कौतुक होत असून त्याचा उपयोग ते मुंबईत कसा करता हे पाहणे गरजेचे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात मध्ये पकडल्या जुन्या लाखो रुपयांच्या नोटा