शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सोहळा पार पडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अनुभव आणि कौशल्य सरकारसाठी काय लक्षात असेल. मला खात्री आहे की, ते महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत करतील.
नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील कौतुक केले आहे. तळागाळातील नेता असं मोदींनी म्हटलं आहे. ज्या नेत्याला राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव असून महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी ते काम करतील असा विश्वास मला आहे, असं ट्विट करत मोदींनी शिंदेंचं कौतुक केलं आहे.