Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मगच मान्सून वेगाने सक्रीय होणार

monsoon condition
अरबी समुद्रात पुढील २४ तासांत 'वायू' हे चक्रीवादळ वेगाने सक्रीय होणार आहे. मुंबईला 'वायू' चक्रीवादळाचा धोका नसला, तरी मुंबईत आणखी पावसाची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्वाचे  म्हणजे, 'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतरच, मान्सून वेगाने सक्रीय होणार आहे.वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे, यामुळे पेरणी करण्याची घाई करू नये, प्रत्यक्ष मान्सून आल्यानंतर पेरणीचा विचार करावा, असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर या दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात आणि मध्य-महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
 
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह कमजोर आहेत. चक्रीवादळ शमल्यानंतर, मान्सूनचे वेगाने प्रगती करणार आहे. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे, वादळ गेल्यानंतर मॉन्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मॉन्सूनच्या आगमनात राज्यात ३ ते ४ दिवसांची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झिरो बॅलन्स खातेधारकांनाही 'या' सुविधा मिळणार