येत्या पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्र दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला वेग दिले आहे.
मान्सून सध्या केरळमध्ये दाखल झाला असून राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. राज्यातील नंदुरबार, हिंगोली, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली.
बिपरजॉय चक्रीवादळ कर्नाटक सीमेजवळ पोहोचला असून लवकरच गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सूनने हजेरी लावली असून तामिळनाडूचा भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन बारा जून पर्यंत राज्यात होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.