Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

माय लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू

माय लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू
करडी भंडारा , मंगळवार, 4 जानेवारी 2022 (10:39 IST)
नागपूरहूनरेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जातअसलेल्या माय लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी रेल्वे कर्मचार्‍यांमुळे समोर आली आहे. पूजा इशांत रामटेके वय 27 व अथर्व इशांत रामटेके वय 18महिने हे मृत माय लेकाचे नाव आहे. 
 
सैनिक असलेला इशांत रामटेके टेकानाका नागपूर हा सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असतानाा पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत धावत समोर गेला.काही कळण्याच्या आतच    मागडी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरून नदीत पडला. मुलाला वाचविण्‍याच्या प्रयत्नातमहिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली. ही घटना रात्रीदरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेक्षकाने वाचवले हॉकी संघाच्या कर्मचाऱ्यांचे प्राण, सामन्यादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान