Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात माय-लेकीचा दुर्देवी मृत्यू

भीषण अपघातात माय-लेकीचा दुर्देवी मृत्यू
, सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (13:17 IST)
आयशर दुचाकीवर उलटून त्याखाली दबून दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींचा दुर्देवी अंत झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चोपडा- अमळनेर मार्गावर घडली आहे. 

जगदीश भीमराव मोतिराळे(42) रा.मामलदे ता.चोपडा हे आपल्या पत्नी उज्ज्वला जगदीश मोतिराळे (32) मुलगा बावीन जगदीश मोतिराळे(10) आणि मुलगी नेहा जगदीश मोतिराळे यांना घेऊन दुचाकी वरून जात असताना चोपडा अमळनेर रस्त्यावर सरकीने भरलेला आयशर यांचा दुचाकीवर पालटला. त्या खाली दाबले जाऊन जगदीश यांनी पत्नी उज्ज्वला आणि मुलगी नेहा या दोघी ठार झाल्या. तर जगदीश आणि मुलगा बावीन हे दोघे जखमी झाले. यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2022 सुरु होण्यापूर्वी Punjab Kings ने शेअर केली आपली जर्सी