Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्ट सिटीकडून रामकुंड पूल पाडण्याच्या हालचाली; नागरिक आक्रमक

ramkund pul
, शुक्रवार, 18 मार्च 2022 (09:09 IST)
नाशिकमध्ये (Nashik) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा, प्राचीन स्मृतीस्थळांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण म्हणजे रामसेतू (Ramsetu) पूल पाडण्याचा निर्णय, त्यानंतर गोदाकाठावरील उद्धवस्त केलेली मंदिरे, नीलकंठ मंदिर परिसरातील तोडलेल्या पायऱ्या आता थेट रामकुंड पूल पाडण्याच्या हालचाली सुरू झालेल्या नाशिकरानी रोष व्यक्त केला आहे.
 
नाशिकला स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात अनेक कामे होत आहेत. तर अनेक कामांमुळे वादही पाहायला मिळाले. दरम्यान आता रामकुंडावरील कामावरून नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. येथील रामसेतू पुलाजवळील पायऱ्या तोडण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील नागरिकांनी विरोध केला होता. आता पुन्हा थेट रामकुंड पूल पाडण्याच्या सुरू झालेल्या हालचाली सुरु झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
विशेष म्हणजे यापू्र्वी रामसेतू पूल बांधण्याचा हट्ट धरताना त्यासाठी ऑडिट झाल्याचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला. मात्र, स्मार्ट सिटीच्या संचालकांनीच तो खोडून काढला. त्यानंतरही या नसत्या खटाटोपी कशासाठी सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येणाऱ्या काळात नाशिकमध्ये महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर अशी वादग्रस्त कामे करून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
रामसेतू पूल पाडण्यासाठी स्मार्ट सिटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, त्यात हा पूल धोकादायक असल्याचा दावा केला होता. मात्र, काँग्रेसचे नगरसेवक तथा स्मार्ट सिटी संचालक शाहू खैरे यांनी हा दावा खोडून काढला. ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळेसच आपण नदीवरील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना केली होती. मात्र, ते कोणीही मनावर घेतले नाही. रामसेतू १९५५ मध्ये बांधला. यावेळी गाडगेमहाराज पुलाचे काम फक्त लाख रुपयात झाले. आता या दोन्ही पुलाचे काम करायचे झाल्यास सव्वाशे कोटी रुपये लागतील. शिवाय रामसेतू पुलाच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत. एका टोकाला नारोशंकर आणि दुसऱ्या टोकाला बालाजी कोट. मात्र, पुलाची उंची वाढवल्यास या मंदिरांना धोका होईल, त्याचे काय असा सवालही त्यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यात खतांचा तुटवडा निर्माण होईल!