Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात, खासगी रुग्णालयात दाखल

dr hina gavit
, सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (08:09 IST)
हीना गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गावित यांची कार एका झाडाला जाऊन धडकली.
 
खासदार गावित यांच्यासह कार्यकर्ते आणि दुचाकीवरील जखमी महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रविवारी दुपारी नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला आहे. खासदार गावित आपल्या काही कार्यकर्त्यांसह कारने एका खासगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी जात होत्या, यावेळी हा अपघात घडला आहे. या अपघातात गावित यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर; वाद वाढत जाणार?