Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्यासाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवली

एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्यासाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवली
, गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (08:32 IST)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळात एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्यासाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 
माध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दोन वर्षात न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी होती की, आम्हाला दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवा किंवा संधी द्या. त्यामुळे आज मंत्रीमंडळात या विषयांची चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाने यापुढे होणाऱ्या एमपीएस परीक्षा आहेत आणि यासाठी लागणारी वयोमर्यादा ज्यांची संपली आहे. त्यासर्वांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय  मंत्रीमंडळात झालेला आहे.
 
पुढे भरणे म्हणाले की, आता जी पीएसआयची जाहिरात येतेय त्याची मुदत १९ तारखेला संपतेय. त्या मुलांना सुद्धा यामध्ये संधी मिळणार आहे. त्यानंतर एक वर्षांची मुदतवाढ किंवा वयामध्ये शिथिलता याबाबतच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री सही करतील. पण याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यार्थींना याचा फायदा होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर