Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’,फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’,फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात
, सोमवार, 5 जुलै 2021 (08:55 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत  उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नील सुनील लोणकर (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली.त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
 
MPSC उत्तीर्ण झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे. आम्ही MPSC ला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला सुनावलं आहे.तर मग त्यांना ही निराशा येते.
 
देवेंद्र फडणवीसपुढे म्हणाले, मला असं वाटतं कुठतरी एकुणच एमपीएससीची जी कार्यप्रणाली  आहे, त्याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती  होत नाहीत. तिथल्या अनेक जागा रिक्त  आहेत. एमपीएससीचे मेंबर्स  देखील आपण भरलेले नाही. मला असं वाटतं हे योग्य नाही. शेवटी आमची जी ही तरुण मुलं आहेत, अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुलं अशाप्रकारच्या परीक्षा देतात आणि 2-2 वर्षे मुलाखत झालीच नाही. तर मग त्यांना ही निराशा येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवर माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमपीएससी परीक्षेसंदर्भात समिती स्थापन करणार; लोणकर आत्महत्या प्रकरणानंतर सरकार सतर्क