मुंबईकरांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बेस्टची वाहतूक बंद आहे. मुंबई महानगरपालिकेने मागण्या मान्य न केल्यामुळे बेस्ट कृती समितीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासून या संपाला सुरूवात झाली . त्यानंतरसकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवरून बेस्टच्या बसेस दिसेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटीसाठी बाहेर निघणाऱ्या बहिणी आणि भाऊरायांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या संपात बेस्टचे तब्बल ३६ हजार कर्मचारी सहभागी होतील, असा कयास आहे. त्यामुळे निश्चितच या संपाची व्याप्ती मोठी असेल. तेव्हा या वादावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास मुंबईकरांच्या त्रासात भर पडणार आहे.