Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai Blast Threat Call: मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

webdunia
, मंगळवार, 23 मे 2023 (13:16 IST)
मुंबईत  बॉम्बस्फोटाची धमकी:  मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोट करण्याची धमकीचे मॅसेज येत आहे. आता पुन्हा एका माथेफिरूने मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा मॅसेज केला आहे. 
 
बॉम्बस्फोटांची धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा हायलर्ट्वर ठेवण्यात आली असून हा मॅसेज कुठून आला यांचा तपास लावला जात आहे. 
 
पोलिसांना 'मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार अशी धमकी देण्यात आली आहे. 
हा मॅसेज सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर पाठवण्यात आला असून त्यात इंग्रजी मध्ये  'I M Gonna Blast The Mumbai Very Soon' असे लिहिले होते. 
 
पोलिसांनी अलर्टमोड घेत हा मॅसेज कुठून पाठवला आहे. त्याच्या तपास घेत आहे. या पूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट करणार असा मॅसेज मेलवरून पाठवण्यात आला होता मात्र या वेळी ट्विटर वरून मॅसेज पाठवण्यात आला आहे. 
 
पोलीस या प्रकरणी तपास लावत आहे. पोलीस सध्या हायअलर्ट मोडवर आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य