Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन नंबर-२’ ची घोषणा

राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन नंबर-२’ ची घोषणा
, सोमवार, 2 मार्च 2020 (10:15 IST)
राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. पवार यांनी असे म्हटले आहे की, महापालिकेत शिवसेना अव्वल स्थानी असल्याने त्यांनी तेथेच रहावे. कारण त्यांनी आता आमच्यासोबत गठबंधन केले आहे. मात्र राष्ट्रवादी पुढील महानगरपालिका निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न जरुर करणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मित्रपक्षाच्याबाबत कोणताच गैरसमज नसला पाहिजे. येत्या काळात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहे.
 
गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांना मुंबई महापालिकेच्या महापौर पदी निवड करण्यात आली. तर उपमहापौर पद हे शिवसेनेचेच सुहास वाडकर यांना दिले होते. खरंतर महापौर पदासाठी शिवसेनेशिवाय कोणत्याही अन्य पक्षाने त्यांचा उमेदवार महापालिका निवडणूकीसाठी रिंगणात उतरवला नव्हता. मुंबई महापौर पदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो. यापू्र्वी फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपच्या समर्थनाने शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदी विराजमान केले होते. महाडेश्वर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किशोर पेडणेकर यांना महापौर पदी नियु्क्ती करण्यात आली. 
 
 मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे 93 नगरसेवक, भाजपकडे 83 आणि काँग्रेस 29 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी 9 जागांवर समाधान मानत हरली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 2019-20 महापालिकेचे बजेट 30,692 कोटी रुपये आहे. तर 2016-17 मध्ये हे बजेट 37,052 कोटी रुपये होते. एवढ्या कोटीच्या बजेटच्या रक्कमेमुळेच देशातील सर्वात श्रीमंत म्हणून महानगरपालिकेला ओळखले जाते. हे बजेट नागालँड,मेघालय, सिक्किम आणि गोवा यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमान गढीचे महंत राजू दास यांची धमकी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही