मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा विरोधात विशेष न्यायालयात 400 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
पाकिस्तान वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याच्याविरुद्ध सोमवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी तहव्वूर राणा याच्यावर 26/11 च्या 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई पोलिसांनी न्यायालयात 400 पानातून अधिकचे आरोपपत्र सादर करण्यात आले. तहव्वूर राणा सध्या अमेरिकेच्या तुरुंगात बंद आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी विशेष न्यायालयासमोर कागदपत्रे येण्याची शक्यता आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
एका अमेरिकी न्यायालयाने खटल्यासाठी मे मध्ये 62 वर्षाच्या तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मान्यता देण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या प्रकरणात राणाविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) (दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्याशी संबंधित गुन्हा) कलम 39A जोडले आहे.
अधिकारी म्हणाले 'आम्हाला राणाविरोधात काही नवीन पुरावे स्टेटमेंट्स आणि कागदपत्रांच्या स्वरूपात सापडले आहेत.' या प्रकरणातील हे चौथे आरोपपत्र असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला मोठा विजय मिळवून देत, अमेरिकेच्या न्यायालयाने या वर्षी मे महिन्यात राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती. तथापि, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी आरोपींच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा आदेश ऑगस्टमध्ये मंजूर करण्यात आला.
राणा यांच्यावर मुंबई हल्ल्यातील भूमिकेसाठी अनेक आरोप आहेत. त्याला
पाकिस्तानी- अमेरिकी दहशतवादी डेव्हिड कोलमन हॅडलीशी जोडले गेले आहे.तहव्वूर राणा याच्यावर 26/11 च्या 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानातून 10 दहशतवादी 26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले आणि 60 तासांपेक्षा जास्त काळ आर्थिक राजधानीला वेढा घातला.या हल्ल्यात एकूण 166 लोक मारले गेले. यावेळी त्यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळे, रुग्णालय आणि ज्यू सेंटर यांना लक्ष्य केले.