Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai : मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी

local train fight
, बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (13:31 IST)
मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये सीट साठी नेहमीच भांडण आणि वादावादी होते. या वादावादीचे मारहाणीत रूपांतरण देखील होते. लोकल मध्ये महिलांची भांडणे होणं हे काही नवीन नाही. आता पुन्हा मुंबईच्या लोकल मध्ये दोन महिलांची हाणामारी झाली असून ही हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला सुमारे पाच हजारहून जास्त युजर्सने लाईक केले आहे. 
 
सदर व्हिडीओ एका लोकल मधला आहे. या मध्ये दोन महिला एक मेकांना हाणामारी करताना दिसत आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे केस ओढवून तिला खाली वाकवताना दिसत आहे. तर दुसरी महिला वेदनेने विव्हळत आहे. तिला वाचवण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या काही महिलांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Andheri : 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक