Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी नाही

आता नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी नाही
, शुक्रवार, 9 जून 2017 (16:36 IST)

मुंबई हायकोर्टाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उठवली आहे. नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला वाढीव एफएसआय देण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार हायकोर्टानं ही स्थगिती उठवली आहे. याआधी 2014 मध्ये राज्य सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंटकरता वाढीव एफएसआय देण्याचा प्रस्ताव आणला होता. ज्याच्या अंमलबजावणीनंतर एखाद्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकाला त्याचा फायदा होऊन त्याला जवळपास 60 मजली उत्तुंग इमारती बांधण्याची मुभा मिळणार होती. मात्र याविरोधात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याला स्थगिती दिली होती.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप