आपण सर्वाना हा अनुभव आला असेल की जेव्हा आपण सिनेमागृहांमध्ये आणि नाट्यगृहांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या कडील अन्नपदार्थ काढले जातात आणि आपल्यावर तेथील महागडे पदार्थ खाण्याची सक्ती केली जाते. अश्या वेळी अनेकदा भांडणे होतात. तर लहान मुलांना तहान लागली तर महागडे पाणी विकत घ्यावे लागते, या अन्यायकारी वागणुकी विरोधात उच्च न्यायलयात अर्ज केला गेला आहे. अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. फास्ट फूड खरेदीच्या सक्तीमुळे घटनेच्या कलम २१ नुसार, जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. कोणत्याही प्रेक्षागृहात घरगुती अन्नपदार्थ घेऊन जाण्यास मनाईसाठी कायद्याचा आधार नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकाला होणारा त्रास कमी होणार आहे आणि लवकरच न्यायालय जसा निर्णय देईल तसा राज्यातील सर्व ठिकाणी आपले घरचे अन्न खाता येणार आहे.
यावर न्यायलय विचार करत असून ही स्थिती मुंबई सह महाराष्ट्र आणि पूर्ण देशात आहे. त्यामुळे येणारा निर्णय हा मोठा असणार आहे.