Publish Date: Fri, 03 Feb 2017 (17:14 IST)
Updated Date: Fri, 03 Feb 2017 (17:16 IST)
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 192 जागा, आरपीआय 25, रासप 5 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार आहे. भाजपने 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 34 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी रहावे लागले आहे.