Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पर्यटकांचा मृत्यू

राज्यात पर्यटकांचा मृत्यू
, सोमवार, 24 जुलै 2017 (11:22 IST)

गटारीनिमित्त मजामस्ती आणि पावसाळ्याचा आनंद लुटताना राज्यभरातील सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात कसारा, नेरळ, कर्जत, वाशिंद आणि अलिबागमध्ये धबधब्यांवर बुडून सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

कसाऱ्याजवळ अशोका धबधब्यात पाय घसरुन बाळासाहेब गोडसे हा तरुण तीनशे फूट उंचावरुन कोसळला. नेरळ येथील आनंदवाडी धबधब्यात मुलुंड येथील सुरेश चेंचकर याचा बुडून मृत्यू झाला, तर कर्जतच्या पाली भुतवली धरणात बुडून मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू झाला.

वासिंद येथे दहागाव जंगलातील नाल्याच्या बंधाऱ्यावर पर्यटनासाठी मुंबई महापालिकेतील 18 कामगार मित्र आले होते. या बंधाऱ्यात संतोष चव्हाण हा कर्मचारी बुडाला. अलिबागमधील चौल येथील रामेश्वर तलावात पोहण्यासाठी उतरलेला मीत कोळवणकर हा पर्यटक बुडाला. कर्जतच्या पेब येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला कल्याण-मलंगगड येथील अब्दुल नावाचा पर्यटक खोल दरीत कोसळला.जव्हार येथील प्रसिद्ध दाभोसा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या जागृती होगले या महिला बाईक रायडरचा डहाणूजवळ अपघाती मृत्यू झाला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजपासून पावसाळी अधिवेशन , विरोधी पक्षांमध्येच फूट