लासलगांव येथील राणा स्टीलचे प्रतिष्ठित व्यापारी राजू राणा यांचा एकुंतला एक भाचा प्रियम रमेश मैथिया (२९) रा.हिल गार्डन हायवे अपार्टमेंट (सायन) हा मुंबईत सुरु असलेल्या मुसळदार पावसात आपल्या मित्राला आणण्यासाठी गेला असता पाण्यात गाड़ी अड़कुन गुदमरुन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रियम हा सायंकाळी घरी आठ वाजता पोहचला.घरी पोहचताच मित्राने त्याला मोबाईल करुण मी पाण्यामध्ये अडकलेलो आहे मला घरापर्यंत सोडून दे याबाबत प्रियमने आपल्या आईशी मित्राला घरी सोडण्यासाठी चाललो आहे असे सांगितले यावर आईने त्याला सांगितले जर तुला उशीर होणार असेल तर मित्राच्या तिथेच थांब पाऊस जास्त सुरू आहे.मित्राला त्याच्या घरी सोडून आल्यानंतर परत घरी येत असताना सायनमध्ये पावसाच्या पाण्यात आपली सॅन्ट्रो कार अडकल्याने आणि संपूर्ण गाडी सेंट्रल लॉक झाल्याने गाडीच्या बाहेर पडणे अवघड झाले .आणि त्त्यात गुदमरून दुर्दैवी प्रियमचा मृत्यू झाला.
घराकडे निघाला असताना सायन येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. मुलाच्या मृत्यूची माहिती सायन पोलीसांनी कुटुंबाला दिली.या घटने ने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला दरम्यान आपल्या एकुंतला एक मुलाच्या निधनाने न खच "जागतीक अवयव दान "दिनाचे औचित्य साधून प्रियमचे डोळे व त्वचा दान केली. आपल्या प्रियमच्या डोळ्यांनी सुंदर जग बघु शकेल. 'प्रियम याच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी दुःख बाजूला सारुन अवयवदान करण्याचे धाडस दाखविणाऱ्या मैथिया कुटुंबाचे मुलाचे अवयवदान करून समाजासमोर आदर्श घालून दिला.