मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच निकाल जाहीर करण्यास झालेल्या दिरगांईबद्दल कुलसचिवांनी प्रथमच विद्यार्थ्यांची जाहीर माफीही मागितली आहे.
मुंबई विदयापीठाच्या आतापर्यंत 153 विभागाचे पेपर तपासून पेपर तपासून झाले असून कॉमर्स आणि कायदा अर्थात 'लॉ'च्या विद्यार्थ्यांची पेपरतपासणी अद्याप बाकी असल्याचं कुलसचिव एम. ए. पठाण यांनी सांगितलं. पुढील शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना तातडीने निकाल हवा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कॉलेजमध्येच विशेष हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे असंही कुलसचिवांनी सांगितल आहे.