Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकच्या आनंदवली दर्ग्याला पालिका प्रशासनाची नोटीस

anandwali
, शुक्रवार, 24 मार्च 2023 (21:38 IST)
नाशिकच्या ईदगाह मैदानावर हिंदू हुंकार सभेचे  आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक साधू महंतांनी हजेरी लावली होती. यात गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपतीला  लागूनच असलेल्या दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याबाबत सरकारला यावेळी इशारा देण्यात आला होता. नवशा गणपती मंदिरा शेजारी असलेला दर्ग्याचे अतिक्रमण असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होता. त्यानंतर आता नाशिक महापालिकेने दर्गेला नोटीस पाठविण्यात आली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस काढली आहे. दर्गेच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटीसमध्ये उल्लेख केला असून सात दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे. सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
सात दिवसात खुलासा न केल्यास...
सामाजिक कार्यकर्त्यांनी नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन करत हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण अनधिकृत असून हे बांधकाम पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकऱ्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता. एकीकडे दर्ग्याचे बांधकाम हटविण्याची मागणी केली जात आहे. संबंधित जागेची पाहणी केली जाईल आणि अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल असे स्पष्टीकरण नाशिक महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले होते. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने रीतसर नोटीस बजावून सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान भावाचे अधिक लाड होतात म्हणून मोठ्या भावाकडून त्याचा खून !