Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने दिली अतिशय महत्वाची अपडेट…

Nashik mahapalika
, सोमवार, 18 एप्रिल 2022 (21:44 IST)
नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची अपडेट दिली आहे.
 
नाशिक शहरातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
 
सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपुर, सिडको, नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी सिमेंटची गुरुत्व वाहीनीला सातमाऊली चौक, महिंद्रा कंपनी कंपाऊंड लगत व त्रंबक रोड डेमोक्रेसी मंगल कार्यालय येथील चौकात पाणी गळती सुरु आहे.
 
सदर दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुधवार दि. 20/04/2022 रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
 
खालीलप्रमाणे नमुद संपुर्ण सातपुर प्रभाग, भागश: नवीन नाशिक प्रभाग व भागश: नाशिक पश्चिम विभागातील प्रभागात बुधवारी दि. 20/04/2022 रोजी पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि. 21/04/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
 
सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपुर्ण परिसर:
प्र.क्र. 8, 9, 10, 11, 26 व प्र.क्र. 27 भागश: मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक
 
नाशिक पश्चिम विभागातील खालील भाग:
प्र.क्र. 7 मधील नहुष सोसायटी परिसर, पुर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर,गीतांजली सोसायटी, पंपीग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरात
 
प्र.क्र. 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर कामगार नगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटे नगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गडकरीची  चौक व गायकवाड नगर परिसर इत्यादी.
 
नविन नाशिक विभागातील खालील भाग:
प्र.क्र. 25 (भागश परिसर) इंद्रनगरी परिसर, कामठवाडा, धन्वतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मी नगर, दत्त नगर, मटाले नगर,
 
प्र.क्र. 26 (भागश: परिसर) शिवशक्ती नगर, आयटीआय पुलाजवळी परिसर बॉम्बे टेलर परिसर
 
प्र.क्र 27 (भागश: परिसर) चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबा नगर, अंबड मळे परिसर
 
प्र.क्र. 28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील या 8 मंदिरांचा होणार जीर्णोद्धार; राज्य सरकारचा निर्णय