Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महापालिका निवडणुका एक महिन्यासाठी पुढे ढकलल्या

voters
, मंगळवार, 24 जून 2025 (13:14 IST)
सर्वोच्च न्यायालयाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दिल्यानंतर, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु आता यासाठी निश्चित केलेल्या तारखांमध्ये बदल झाल्यामुळे, महापालिका निवडणुका सुमारे 1 महिना पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे
निवडणुकीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत, प्रभाग रचना 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम करायची होती, ज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची मान्यता देखील समाविष्ट होती. परंतु सोमवारी नगरविकास विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया एक महिना उशिराने सुरू असल्याने निवडणुका देखील एक महिन्याने उशिराने होणार असल्याची माहिती सूत्रां कडून मिळाली आहे. 
12 जून रोजी नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात, संबंधित महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायचा होता. हा मसुदा 8 ते 10 जुलै दरम्यान पाठवायचा होता.
ALSO READ: नागपुरात पगार न मिळाल्याने तरुणाने मालकाच्या 2 ट्रकला पेटवले
परंतु 23 जून रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आता संबंधित महापालिका आयुक्त प्रथम 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्य नगरविकास विभागाकडे प्रभाग रचनेचा मसुदा सादर करतील. नवीन आदेशात काही नवीन प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव हे प्रभाग रचनेचा मसुदा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. 
जुन्या कार्यक्र्मावरून निवडणूका दिवाळीत होण्याची शक्यता घेऊन सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मालेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा विजय