Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार

मराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार
, मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (21:34 IST)
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने परिपत्रक काढण्यात आले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा महानगरपालिकेतील जवळपास १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार असून यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ५२ लाख ६३ हजार रुपयांचा भार पडणार आहे.
 
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी भाषा विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी २०१५ पासून पुढे बंद होती. त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढ पासून वंचित होते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी २०१६ ते २०१८ पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.
 
त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर या प्रश्नचा आढावा घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. या विषयावर गेल्या आठवड्यांत झालेल्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्यानंतर या विषयाची तपासणी करून आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता – कृषीमंत्री