पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने दुसऱ्या मद्यपीचा भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केला. अनिल शिंदे (वय- ५०) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून यश गोपी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला घटनास्थळावरून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दापोडीत भर वस्तीमधून एकमेकांची तोंड ओळख असलेला आरोपी यश आणि अनिल हे जात होते, तेव्हा दोघांनी मद्यपान केले होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि अनिल शिंदे याने यशला आईवरून शिवीगाळ केली. आईवरून शिवीगाळ केल्याने यशला प्रचंड राग अनावर झाला व त्याने संतपाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड अनिलच्या डोक्यात घालत, त्याचा दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, हे थरकाप उडवणारे दृश्य घटनास्थळी उपस्थित सर्वसामान्य नागरीक पहात होते. मात्र यशला अडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.