साताऱ्यात एका नराधमाने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबा येथे घडली आहे. योगिता दत्ता नामदास(38) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
योगिता ही आपल्या दोन्ही मुलांसह वेलंग शिरंबा येथे राहत होती.तिचे बाहेर कोठे प्रेम संबंध आहे आणि या संशयावरून तिची गळा आवळून हत्या केली आणि तिच्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता नारायण नामदास याला अटक केली आहे.