कोल्हापुरात मटन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी मटणाचे भाव तब्बल ५८० ते ६०० रुपये किलोवर गेलेले आहेत. त्यामुळे मटणावर ताव मारणाऱ्या कोल्हापूरकरांना मटणाची ही भाववाढ परवडत नाही. म्हणूनच सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्रंबोली यात्रेच्या पार्श्वभूमीवर ४२५ रुपये किलो अशा सवलतीच्या दरात एक नंबर मटन विक्री केंद्र थाटायला सुरुवात केलीय.
मटण विक्रेते महागाईचे कारण देत मटणाची दर कमी करायला तयार नाहीत. सुरुवातीला कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथल्या तरुण मंडळांनी मटन विक्रेत्यांना दर कमी करण्याची विनंती केली.त्यांनी ही विनंती धुडकावताच मटन थेट नदी पलीकडून आणण्याचा बोर्ड झळकावला.तिथूनच खऱ्या अर्थाने या आंदोलनाची ठिणगी पडली.