Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड, माझा भाजप प्रवेश निश्चित: राणे

मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड, माझा भाजप प्रवेश निश्चित: राणे
शिवसेना-भाजपमध्ये होवो अथवा नाही, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड होतं. मी भाजपमध्ये गेल्याने भाजपचही पारडं जड होणार असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं सिंधुदुर्गात स्वागत करण्यात आलं. त्यांनी मला महाजनादेश यात्रेचं निमंत्रण दिलं असतं तर महाजनादेश यात्रेत सहभागी झालो असतो. पण निमंत्रण न दिल्याने व्यासपीठावर गेलो नाही, असंही ते ते म्हणाले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात येणार असल्याचं सांगतानाच नितेश राणेसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपच्या तिकीटावरच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करतानाच आपण स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये जाण्यासाठी कोणतीही अट ठेवली नसून कोणतीही मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद पवारांचा अमित शहाना टोला