Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nagpur : पुण्यानंतर नागपुरात वेगवान कार ने तिघांना उडवलं, चौघांना अटक

Nagpur : पुण्यानंतर नागपुरात वेगवान कार ने तिघांना उडवलं, चौघांना अटक
, शनिवार, 25 मे 2024 (10:53 IST)
पुण्यानंतर आता नागपुरात वेगवान कार ने तिघांना उडवलं असून  तिघे जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे. या घटनेनंतर उपस्थित लोकांनी कार चालकाला बेदम मारहाण केली. कार मध्ये दारूच्या बाटल्या आणि इतर औषधे सापडले असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. 
 
सदर घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या जेंडा चौक परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. भरधाव येणाऱ्या कार ने तिघाना  धडक दिली. या अपघातात महिला तिचा मुलगा आणि तरुण जखमी झाले. लोकांनी एका आरोपीला पकडले आहे. त्यांनी आरोपींना मारहाण करत कारची तोडफोड केली.
नागपूरचे डीसीपी गोरख भामरे यांनी सांगितले की,आम्ही याप्रकरणी कार चालकासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. कारमधून दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यातील मतदान सुरू