Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातही लवकरच दिशा कायदा : देशमुख

महाराष्ट्रातही लवकरच दिशा कायदा : देशमुख
नागपूर , शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (11:28 IST)
महिलांवरील अत्याचारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच कठोर कायदा करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 
 
आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासठी गृहमंत्री अनिल देशुख विजयवाडा येथे गेले होते. त्यांच्यासोबत अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अश्र्वती दोरजे आदी वरिष्ठ अधिकारी होते. या शिष्टमंडळाने आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री मेकाथोटी सुचारिथा यांची भेट घेतली व त्यांच्याकडून दिशा कायद्याचे स्वरूप, प्रक्रिया  आदींची विस्तृत माहिती घेतली. मकाथोटी सुचारिथा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशुख यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनोहन रेड्डी यांचीही भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री रेड्डी यांनी राज्यात महिला अत्याचार प्रतिबंधाच्या विविध उपाययोजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात दिशा कायदा लवकरच लागू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. महिलांवरील अत्याचारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आंध्रात जो दिशा नावाचा कायदा झाला आहे. त्या कायद्याची मा हिती घेण्यासाठी मी व वरिष्ठ पोलीस आधिकारी आंध्रला आलो होतो. आम्ही या कामाबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे. पुढील कार्यवाहीसाठी आम्ही पाच पोलीस अधिकार्‍यांची टीम तयार केली आहे. या टीमचे नेतृत्व पोलीस महानिरीक्षक अश्र्वती दोरजे यांच्याकडे असणार आहे. ही टीम सात दिवसांत आपला अहवाल देईल.
 
हा अहवाल आल्यानंतर आम्ही लवकरात लवकर कॅबिनेटपुढे हा विषय आणू व अधिवेशनात चर्चा घडवून आणून लवकरात लवकर नवा कायदा करू, असे देशमुख यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापोर्टल अखेर बंद : फडणवीस सरकारचा निर्णय रद्द