Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर ! शहर पाण्याखाली, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

nagpur rain
, शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (13:44 IST)
Heavy Rain In Nagpur: नागपुरात पावसाचा उद्रेक सुरु आहे. सर्वत्र पाणी साचले असून शहरात पूरसदृश्य परिस्थिती उदभवली आहे. मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक घरात पाणी शिरले. पुरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. एनडीआरएफची पथके बचावकार्य करत आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे. 

शहरात सर्वत्र पाणी भरले आहे. त्यामुळे शाळा -महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 
शुक्रवार पासून पासून सुरु असून पावसाचा वेग वाढला पावसाची तीव्रता वाढल्यामुळे अंबाझरी तलाव देखील ओसंडून वाहत आहे. नागपूर विमानतळावर पहाटे 5.30 वाजेपर्यंत 106 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक भाग जलमय झाले असून रस्ते जलमय झाले आहेत. परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे.
 
आजूबाजूचा सखल भाग मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. शहराच्या इतर भागातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती आहे.  
 
2 एनडीआरएफच्या (NDRF) टीम कार्यरत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या (SDRF) टीमने आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना गरज नसल्यास बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 
 


 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक !उंदरांचा 6 महिन्याच्या बाळावर हल्ला