Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 15 February 2025
webdunia

आधी सिनेमा बघा त्यानंतर त्याचा विरोध करा : नाना पाटेकर

आधी सिनेमा बघा त्यानंतर त्याचा विरोध करा : नाना पाटेकर
संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे, असं सांगतानाच आधी सिनेमा बघा त्यानंतर त्याचा विरोध करा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीच्या सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ बाकीच्यांना आवडला असेल, पण मला नाही. गरजेचं नाही की, ठप्पा लावलेले सर्वच सिनेमे आवडतील.” असे त्यांनी सांगितले. 
 
कुणी उगाच कुणाला टार्गेट करत नाही. मीही कलाकार आहे. कलाकार आणि दिग्दर्शकाची स्वत:ची एक जबाबदारी असते, ती ओळखून काम करायला हवे, असे मत नानांनी मांडले. “आपण कुणाला आयुष्य देऊ शकत नाही, मग कुणाचा जीव घेण्याचा अधिकारही आपल्याला नाही. त्यामुळे ‘पद्मावती’ सिनेमाच्या विरोधासाठी नाक, डोळे कापण्याची भाषा योग्य नाही.”, असे म्हणत त्यांनी ‘पद्मावती’ सिनेमाबाबत समर्थनही दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फोटोतील सुंदर अशी तरुण पोलीस अधिकारी आहे तरी कोण?