Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार
, बुधवार, 19 जून 2019 (16:27 IST)
राज्यातील बहुचर्चीत व वादात अडकलेला सोबतच स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असलेला नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar refinery project) आता कोकणातील रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार आहे. नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याबाबत स्थानिकांचा विरोध नाही, असं लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिल आहे त्यामुळे मोठ्या राजकीय वादाला विराम मिळाला आहे. येथील 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला कोणताही विरोध नाही. तर अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन येथील 40 गावं प्रकल्पाच्या बाजूने आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिकांच्या आणि राजकीय विरोधामुळे नाणार रत्नागिरी येथून तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला हलवल्याचं मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर सांगितले आहे. कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा जोरदार विरोध केला, त्यामुळे शिवसेनेने मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेने भाजपसोबत युती करताना नाणार रद्द करण्याची अट ठेवली होती. ही अट भाजपकडून मान्य करण्यात आली आहे. तर 2 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या अखेरच्या फाईलवर सही केली होती. त्यामुळे आता मोठ्या वादावर पडदा पडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीबीसी इंटरनॅशनल प्रेक्षक संख्या 426 मिलियन